topics3

topic3
वैयक्तिक स्वास्थावर परिणाम करणरे घटक

१.वैयक्तिक स्वास्थावर परिणाम करणारे घटक :
१.त्वचा : आपले शरीर व भोवतालचा परिसर यामधील भिंत होय.
त्वचेची कार्य :
१.थंडी ,उष्णता,इजा,दुखापत यापासून संरक्षण करते.
२.बाहेरील रोगजंतुन आत प्रवेश करू देत नाही.
३.त्वचेला छिद्र असतात त्यातून मीठ ,युरीया व अशुध्द द्रव्य घामावाटे बाहेर टाकते.
४.सुर्य प्रकाशातून ड जीवनसत्व मिळते.
५.त्वचा हे पंचज्ञानेंद्रिय मधील महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे तिच्या असलेल्या मज्जातंतूमुळे मनुष्याला स्पर्श ज्ञान होते.

२.तोंड : तोंडा मध्ये अन्न चाखले जाते.अन्नाचावतांना तोंडांत लाळ हा पाचक रस मिसळतो.लाळेमध्ये टायलीन नावाच्या द्रव्यामुळे पोष्ट्मय पदार्थाचे मल्टोज मध्ये रुपांतर होते.

३.दात: दात मनुष्याला दोन वेळ येतात दुधाचे दात पडल्यावर नवीन येणाऱ्या दाताची संख्या २८ ते ३२ असते .अन्न चावण्याचे काम पटाशीचे दात करतात अन्न सोलण्याचे काम सुळे दात करतात.अन्न फोडण्याचे काम दाढा करतात.

४.घसा : तोंडातून अन्न पचविण्यासाठी पाठविण्याचे कार्य घसा करते.

५.जीभ : अन्न घशाकडे ढकलण्याचे कार्य करते व जीभ बोलण्याचे कार्य सुद्धा करते.

६.नाक : नाक श्वसनसंस्थेतील महत्वाचे इंद्रिये आहे.

७.डोळा: दृष्टीज्ञान देणारे महत्वाचे ज्ञानेद्रिये होय यामुळे ८० टक्के ज्ञान मिळते.

८.नखे : अस्थी संस्थेतील एक महत्वाचा भाग म्हणजे नखे होय प्रसंगानुरूप घातक ठरणारे वाघनीच्या नखाप्रमाणे ही नखे होय.\

९.कपडे : कपडे लज्जा राखण्याचे कार्य करतात व तसेच आतील भागाचे संरक्षणचे कार्य करतात .कपडे ऋतू मनाप्रमाणे वापरावी हिवाळ्यात लोकरीची कपडे,उन्हाळ्यात पांढरे कपडे,पावसाळ्यात रेनकोट .

१०..कान : ऐकण्याचे कार्य करणारे श्रवणद्रीये होय यामुळे ७० टक्के ज्ञान मिळते.

११.पादत्राणे : पायाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून आपण पादत्राणे वापरावी अनेथा संसर्गजन्यरोग होण्याची शक्यता असते.

१२.अंथरूण : झोप घेण्यासाठी स्वच्छ व चांगले अंथरूण हवे.

१३.हालचाल : हालचाली मुळे वाढ व विकास होतो.

१४.क्रिडा : निरर्थक व निर्हेतुक हालचाल करणे म्हणजे क्रिडा होय.

१५.विश्रांती : विश्रांती म्हणजे झोप नव्हे तर change of work is rest.

१६.झोप : मानसिक ताण ,चिंता ,दु:ख यावर झोप यासारखा रामबाण उपाय नाही.

१७.आहार : आहार ,स्वच्छता व सवयी या त्रीयावर आरोग्याचा पाया अवलंबून आहे.

आहाराचे महत्व :
१.आहार समतोल असावा.
२.आहार विविधतेने नटलेला असावा.
३.ऋतुमानानुसार आसावा.
४.पोषण मुल्ये असलेला असावा.
आहारा संबंधी सुचना :
१.शिळे पाके अन्न खाऊ नये.
२.उघडे अन्न खाऊ नये.
३.नासकी –कुजकी फळे खाऊ नये.
४.स्वस्त व महागाचा विचार न करता पोषण मुल्याचा विचार करावा.



२.घर,शाळा आणि परिसर संदर्भात सामुहिक स्वास्थावर परिणाम करणारे घटक :
१.स्वच्छतागृह : शहर स्वच्छता राखण्यासाठी रेल्वे स्थानक,बसस्थानक ,चौक,विविध चाळ्यात स्वच्छतागृह असावी.
२.स्नानगृह : शहरातच नव्हे तर खेड्यात सुद्धा स्नानगृह असावी म्हणजे विहरी ,नदी,नाले,तलाव यातील पाणी स्वच्छ राहील.
३.परिसर : आपल्या सभोतालचा भाग म्हणजे परिसर होय,या परिसरात शुध्द हवा,शुध्द पाणी व भरपूर सूर्यप्रकाश मिळावा.
४.उद्याने : उद्याने म्हणजे बगीचा होय गावाचे व शहराचे निसर्ग सौदर्य खुलवण्यासाठी उद्याने आवश्यक आहेत.
५.पाणवठा : आपल्याला पिण्यासाठी लागणारे पाणी मिळण्याची जागा म्हणजे पाणवठा होय,पाणी शुध्द मिळण्यासाठी पोटशिअम परमगनेट टाकावे.
६.पोहाण्याचा तलाव : शरीर वृद्धी वाढवण्यासाठी पोहण्यामुळे व्यायाम होतो. तलावात उतरण्यापूर्वी मलमूत्र विसर्जन करावे व पाणी वारंवार बदलावे त्याच बरोबर पाण्यात क्लोरीन टाकावे व पोहाण्यापुर्वी सर्वांना विषमज्वर इंजेक्शन टोचावे .
७.क्रीडांगणे : क्रीडांगण हा शाळेचा आत्मा आहे म्हणून क्रीडांगणावर झुडपे ,गवत वाढू देऊ नये.
८.कचऱ्याची विलेवाट : शिळे अन्न व पाचोळा यात प्लास्टिक टाकू नये.कचऱ्यापासून शेतीसाठी कंपोस्ट खत तयार करता येईल व कचरा हा सार्वजनिक कुंडीत टाकवे.
९.सांडपाण्याचा निचरा : घर उंचावर असावे व घरातील सांडपाणी नळाद्वारे परसबगेला घालावे.

३.मानसिक स्वास्थावर परिणाम करणारे घटक :
१.कुटुंब : कुटुंबातून मुलांना आपलेपणा ,प्रेम,सुरक्षितता,स्विकार ,स्वतंत्र व्यक्तीमत्वाचा सन्मान ,मनोरंजन व मित्र सहवास मिळावा.
२.आर्थिक परिस्थिती : कुटुंबातून मुलांच्या सगळ्या गरजा व समस्या भागवल्या जावे.
३.अज्ञान : अंधश्रद्धेमुळे शारीरिक व मानसिक रोग वाढतात त्यामुळे अज्ञान दूर करावे.
४.सामाजिक रूढी : सामाजिक रूढी पळतांना आपल्या हातून अनेक चुका घडतात त्या होऊ नये उदा- उपास करतांना बटाटा व साबुदाणा खाऊ उपासाच्या नावाने आरोग्य खराब करणे.
५.मानसिक संघर्ष : मनाची व्दिधा अवस्था झाल्यास मानसिक संघर्ष निर्माण होतो.
६.गराजाची पूर्ती न होणे : मानवाला सुखी जीवन जगण्यासाठी त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजे.
७.दुर्बल मन : व्यक्ति मनाने दुर्बल असेल तर कोणताच निर्णय योग्य रितीने घेऊ शकत नाहीत.
८.संगोपण : बालकांचे योग्य संगोपण होण्यासाठी १.अनुवंश ,२परिस्थिती घटक कारणीभूत आहेत.
मुख्य पृष्ठ